Ad will apear here
Next
वीर सेवा दलाच्या कोरोची शाखेतर्फे वृक्षारोपण
कोरोची (कोल्हापूर) : वीर सेवा दलाच्या कोरोची शाखेच्या वतीने कोरोची येथील शांतिसागर मैदान व स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विविध प्रकारची ५० रोपे या वेळी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली.

वृक्षारोपणासाठी कोरोची ग्रामपंचायतीचे सरपंच सर्जेराव माने, वीर सेवा दलाच्या मध्यवर्ती समितीचे क्रीडा व वृक्षारोपण विभागप्रमुख सुभाष मगदूम, स्वयंसेवक विभागप्रमुख अनिल भोकरे, मंदिर कमिटी उपाध्यक्ष अमोल पाटील, सोसायटीचे संचालक आदगौडा पाटील, अशोक एकसंबे, कुमार पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

करंज, गूळभेंडी, पिंपळ, कॅशिया, रेन ट्री, गुलमोहर, लिंब अशी सात प्रकारची रोपे या वेळी लावण्यात आली. याबरोबर त्याच्या संरक्षणासाठी शेडनेटचे आच्छादनही करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी कोरोची शाखेच्या कार्याचे कौतुक केले. स्नेहवस्त्र, श्रीफळ व रोपे देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वृक्षारोपणासाठी संघनायक स्वप्नील उपाध्ये, जिल्हा सचिव विजय बरगाले, शीतल पाटील, बाहुबली उपाध्ये, वीरेंद्र कुरुंदवाडे, जितेंद्र चौगुले, राजगोंडा पाटील, सुभाष खुरपे, राहुल एकसंबे, प्रवीण पाटील, बाहुबली पाटील, शीतल चावरे, कुलभूषण पाटील, सागर चावरे, सतीश पाटील, राहुल पाटील, सूरज पाटील, राजू चावरे, महावीर उपाध्ये, सचिन खोत, पार्श्व पाटील, सोहम पाटील, आविष्कार बरगाले, सुजल कुरुंदवाडे, आदित्य चावरे, अभिजित बरगाले आदी मुलांनी परिश्रम घेतले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZMJBE
Similar Posts
नऊ जुलैला वृक्षारोपण कार्यक्रम कोल्हापूर : कोरोची येथील वीर सेवा दलाच्या वतीने रविवारी, नऊ जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या वेळी कोरोचीचे सरपंच सर्जेराव माने, वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे सहकार्यवाह आणि क्रीडा व वृक्षारोपण विभागप्रमुख सुभाष मगदूम, स्वयंसेवक विभागप्रमुख अनिल भोकरे, जैन समाज अध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे
वीर सेवा दलातर्फे पुरातन मंदिरांची स्वच्छता कोरोची : वीर सेवा दल प्रांतीय जिल्हा व तालुका समितीच्यावतीने पुरातन मंदिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानांतर्गत भोगोली, इब्राहीमपूर, स्तवनिधी, बांबवडे (धर्मगिरी) टाकवे येथील जैन मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये ७० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
वीर सेवा दलातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर कोरोची (कोल्हापूर) : स्वातंत्र्यदिन आणि वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या पुण्यतिथी निमित्त कोरोची येथील वीर सेवा दल आणि जयसिंगपूर येथील ‘पायोस हॉस्पिटल’ यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर कस्तुरबा गांधी बालवाडी येथे सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळेत होणार आहे
‘युवतींनी स्वत:तील क्षमता सिद्ध करावी’ कोरोची : ‘युवतींनी वाईट गोष्टींपासून परावृत्त होऊन आपल्या करियरकडे जास्त लक्ष द्यावे, आपल्यातील क्षमता सिद्ध केल्यास जग आपोआप तुमच्याकडे वळेल’, असे मत सहाय्यक गटविकास अधिकारी दिप्ती गाट यांनी दिला. आळते येथील युवती सक्षमीकरण शिबिराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर मल्टीस्टेटचे चेअरमन सुकुमार पाटील होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language